Advertisement

अक्षय-मल्लि‍काच्या 'त्या' वादात ट्विंकलची उडी


अक्षय-मल्लि‍काच्या 'त्या' वादात ट्विंकलची उडी
SHARES

अभिनेता अक्षय कुमार आणि मल्लि‍का दुआ यांच्यातील वाद अजूनही शमताना दिसत नाही. या वादात आता अक्षयची पत्नी ट्विंकलनेही उडी घेतली आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शो मध्ये अक्षयने केलेल्या कमेंटवरून सोशल मीडियावर आगपाखड होत आहे. पण आता अक्षयच्या बचावासाठी या वादात त्याची पत्नी ट्विंकलेनं देखील उडी घेतली आहे.



ट्विंकल खन्नाने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये ती म्हणते, द लाफ्टर चॅलेंज या शो मध्ये झालेल्या वादावर मला बोलायचे आहे. या शोमध्ये चांगला परफॉर्मन्स देणाऱ्या स्पर्धकासाठी घंटा वाजवण्याची पद्धत आहे. वाजवा 'बजाओ' या शब्दाचा वापर रेड एफएमवरही केला जातो. 'बजाते रहो' ही रेड एफएमची टॅगलाईन आहे. पण यावरून कोणताही लैंगिक वाद होत नाही.


काय आहे हा वाद?

या शोमधील स्पर्धक शाम रंगीला याने चांगला परफॉर्मन्स दिल्यामुळे अक्षय कुमार नियमाप्रमाणे प्रेक्षकांमध्ये लावलेली मोठी घंटा वाजवण्यासाठी गेला. तिथे मल्लिका दुआ आणि इतर दोन मेंटॉरही मागे गेले. यावेळी घंटा वाजवत असताना अक्षयने एक कमेंट केली, तो म्हणाला 'मल्लिका जी आप बेल बजाओ, मैं आपको बजाता हूं'. याच कमेंटवरून मल्लिका आणि तिचे वडील विनोद दुवा यांनी आक्षेप घेतला आहे.


हेही वाचा - 

मल्लिका दुआ का भडकली अक्षय कुमारवर?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा