Advertisement

अक्षय कुमारच्या लाफ्टर शोमधून मल्लिका दुआसह तिन्ही जजेस आऊट!


अक्षय कुमारच्या लाफ्टर शोमधून मल्लिका दुआसह तिन्ही जजेस आऊट!
SHARES

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोनं ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्लसवर नव्या रूपात एन्ट्री केली. ९ वर्षांपूर्वी या शोनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगलाच धुमाकूळ घातला होता. या कार्यक्रमानं अनेक प्रसिद्ध विनोदवीर मनोरंजन क्षेत्राला दिले. पण सध्या या शोकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोला हवी तेवढी पसंती मिळत नसल्याचं शो रेटिंगवरून समोर आलं आहे.

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोला पसंती मिळत नसल्यानं या कार्यक्रमाचे प्रशिक्षक जाकीर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलाल यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आता या तिघांची जागा श्रेयस तळपदे आणि साजिद खान घेणार आहे.


'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना साजिद खान म्हणाला की, 'मुळात हा कार्यक्रम याच पद्धतीनं तयार करण्यात आला होता. योग्य स्पर्धकांची निवड करणं हेच जाकीर, मल्लिका आणि हुसैन यांचं काम होतं. आता मला आणि श्रेयसला अक्षयसोबत हे काम पुढे घेऊन जायचं आहे. लवकरच कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.'



हेही वाचा

...म्हणून ते किशोर कुमार होते!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा