Advertisement

कलावंताची मांदियाळी 'लोकरंग महोत्सव २०१८'


कलावंताची मांदियाळी 'लोकरंग महोत्सव २०१८'
SHARES

आपल्या लोकसंगीतांचं, लोकसंस्कृतीचं जतन व्हावं यासाठी आयोजित केलेल्या 'लोकरंग महोत्सव २०१८ - प्रवास परंपरेचा' या कार्यक्रमाला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये जोरदार सुरुवात झाली. यावेळी मुंबईच्या रसिक प्रेक्षकांनी या लोककलेचा मनमुराद आनंद लुटला. 'महाराष्ट्र- सांस्कृतिक अभियान'तर्फे लोकरंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.


प्रेक्षकांनीही धरला ठेका

पहिल्या दिवशी जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अनुराधा पौडवाल यांनी 'चांदणं चांदणं झाली रात' हे गाणं गात प्रेक्षकांची पुन्हा मनं जिंकली. यावेळी अरूण पेदे वेसावकर या कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रमातील कोळी गीतांवर प्रेक्षकांनीही ठेका धरला. प्रत्येक गाण्याला टाळ्या, शिट्या, वन्समोअरने सभागृह दणदणून गेलं.

गेले १८ वर्ष ही संस्था नवनवीन प्रयोग करत आहे. सतत प्रेक्षकांना नाविन्य देण्याचा या संस्थेचा प्रयत्न असतो. मी जेव्हापासून टी-सिरीज साठी कामं करायला सुरुवात केली त्या आधीपासून वेसावकर हे अग्रगण्य नावं आहे.
- अनुराधा पौडवाल, गायिका

सुमारे १२५ कलावंतांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. ३ दिवसांत सुमारे २७०० रसिक या महोत्सवाचा लाभ घेऊ शकतील. या महोत्सवाचे मुंबई लाईव्ह मिडीया पार्टनर आहे. दरवर्षी उद्योग, क्रीडा, राजकीय, चित्रपट - मालिका क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या महोत्सवाला हजेरी लावतात.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा