मुंबई फोटोग्राफर्स असोसिएशनचा उद्घाटन सोहळा

 Prabhadevi
मुंबई फोटोग्राफर्स असोसिएशनचा उद्घाटन सोहळा

मुंबई फोटोग्राफर्स असोसिएशनचा उद्घाटन सोहळा शनिवारी रात्री प्रभादेवीच्या रचना संसद सभागृहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन भाग्यश्री पवार यांनी केले.

भारतात तंत्र कुशलता आणि नव्या तंत्रज्ञनाची तरुण पिढीला माहिती असणे किती आवश्यक आहे, याविषयी राणे यांनी भाष्य केले. कौस्तुभ जोशी आणि अंकिता कोलते यांनी सुरू केलेल्या मुंबई फोटोग्राफर्स असोसिएशनला शुभेच्छा देताना राणे यांनी सिद्धिविनायक मंदिराकडून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांची माहितीदेखील दिली.

Loading Comments