Advertisement

सोनू सूदला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश

सोनू सूद विरोधात सध्या कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं पालिकेला दिले आहेत.

सोनू सूदला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश
SHARES

अभिनेता सोनू सूदला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. सोनू सूद विरोधात सध्या कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) अभिनेता सोनू सूदला अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अभिनेता सोनू सूदनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आव्हान देणारी सोनू सूदची याचिका फेटाळली होती. त्याविरोधात त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

यानंतर अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने 'न्याय मिळतोच' (Justice prevails) असे कॅप्शन देत एक निवेदन शेअर केले आहे. यामध्ये त्याने एक हॅरिसन फोर्ड यांचा एक quote देखील लिहिला आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'युद्धा होत नसणे म्हणजे शांतता नव्हे तर, न्याय मिळणे म्हणजे शांतता.'

दरम्यान सोनूनं आपली याचिका मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. पालिकेला दिलेल्या निवेदनावरील निर्णयाची सोनू सूद प्रतीक्षा करेल, असं सांगण्यात येत आहे. सोनूचे वकिल मुकुल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं की, सोनूनं स्वत:ची बाजू पालिकेसमोर मांडली आहे. त्यांच्या निर्णयाची तो आता प्रतीक्षा करेल.

जुहू परिसरात सोनू सूदच्या मालकीची ६ मजली इमारत आहे. ही रहिवासी इमारत असूनदेखील या इमारतीमध्ये सोनू सूदने परवानगी न घेता हॉटेल सुरू केलं असा आरोप पालिकेनं केला होता. Maharashtra Region & Town Planning कायद्याअंतर्गत सोनू सूद विरोधात पालिकेनं जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.



हेही वाचा

पडद्यावरचे 'बाबा चमत्कार' अभिनेते राघवेंद्र काडकोळ यांचं निधन

रोहीत शर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका, कंगनावर ट्विटरची अॅक्शन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा