सेन्सॉर बोर्ड हवा का?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून प्रकाश झा यांचा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली. त्याला कारणही तसंच आहे. 'लिपस्टिक अंडर माय बुरखा ' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डने प्रमाणपत्र देण्यास नकार दिलाय. या सिनेमात अश्लील भाषा आणि आक्षेपार्ह सीन्स असल्याचं म्हटलं जातंय. तसंच हा सिनेमा असंस्कारी आहे असं ही सेन्सॉर बोर्डने म्हटलंय.

या निर्णयामुळे सर्वच स्थरांतून नाराजी व्यक्त केली जातेय. 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा सिनेमा मुंबई फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवण्यात आला होता. प्रकाश झा नेही सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल सामान्य मुंबईकरांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यातल्या काही लोकांनी, सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला परवानगी द्यावी कारण जर, अश्लील सीन्स आणि भाषा म्हणून या सिनेमाला प्रमाणपत्र मिळत नसेल तर असे अनेक सिनेमे आहेत, ज्यामध्ये बऱ्याच वाईट गोष्टी दाखवल्या जातात. मग त्याला प्रमाणपत्र कसं मिळतं? असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

Loading Comments