मुंबईत उलगडणार 'ममी'चे रहस्य

  मुंबई  -  

  काळाघोडा - आतापर्यंत आपण इजिप्तची ममी तुम्ही हॉलिवूडच्या चित्रपटांतून पाहिली असेल... पण आता टॉरमिक काळातली, सुमारे 2300 - 2400 वर्षं जुनी ममी मुंबईकरांना प्रत्यक्षात पाहता येणाराय. मुंबईत प्रथमच छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालयात ही ममी प्रदर्शित करण्यात येतेय. त्यासाठी पर्यटकांकडून इतर कोणतेही वाढीव दर आकरले जाणार नाहीत. भारतात ब्रिटिश राजवटीदरम्यान अधिकाऱ्यांनी इजिप्तमधील पुरातन वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा केल्या होत्या. त्यातला एक भाग त्यांनी भारतातील संग्रहालयांना भेट दिलाय. हे प्रदर्शन 27 ऑक्टोबरपासून सुरू झालंय. सकाळी 10.30 ते 5 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं असेल.

  प्राचीन इजिप्तमध्ये मृत्यू हा अस्तित्त्वाचा अंत नाही, तर मृत्यूनंतर माणसाचं दुसऱ्या जीवनात संक्रमण होतं, असं मानलं जात होतं. त्यामुळे त्या व्यक्तीला परत येण्यात अडचण येऊ नये म्हणून शरीराचं जतन केलं जाई. शवावर खास उपचार केले जात. मिठातील नॅट्रोनचा उपयोग करून शरीर सुकवण्यात येत असे. नंतर ते कापडाच्या अनेक पट्टय़ांत गुंडाळून मुखवट्यानं सजवण्यातही येई. नेहमीच्या उपयोगातल्या वस्तूही या ममीसोबत ठेवल्या जात. या ममीसोबतही दावरेत नावाची देवी आणि तिच्या सहाय्यकाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. या ममीचं जतन करण्यासाठी निधी उपलब्ध होईल, अशीही या प्रदर्शनामागील कल्पना आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.