Advertisement

मल्टीस्टारर 'बसस्टॉप'चं म्युझिक लाँच; आता प्रतिक्षा सिनेमाची!


SHARES

मराठी सिनेसृष्टीतील मल्टीस्टार्सना एकत्र आणणारा 'बसस्टॉप' हा सिनेमा २१ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आजचे तरुण कलाकार आणि ज्येष्ठ अनुभवी कलावंतांच्या ताफ्यात बनलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानीच ठरणार आहे. मराठी रॅपर श्रेयश जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे, तर समीर जोशींनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं नुकतंच धम्माल, मस्तीत म्युजिक लाँच करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच बसस्टॉपचा टीजर पोस्टर बसवर लाँच करण्यात आला होता.नवीन फ्रेश चेहऱ्याच्या 'बसस्टॉप' या सिनेमातील गाणी रसिकांचा मूडदेखील फ्रेश करुन टाकतात. या सिनेमातील 'मूव्ह ऑन', 'आपला रोमान्स', 'घोका नाही तर होईल धोका' आणि 'तुझ्या सावलीला' ही गाणी तरुणाईला भुरळ घालणारी आहेत.

अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळणार असून, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी या ज्येष्ठ कलाकारांची देखील यात प्रमुख भूमिका आहे. स्टारकास्टच्या जल्लोषपूर्ण वातावरणात लाँच करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलरदेखील रसिकांना दाखविण्यात आला. या ट्रेलरमध्ये दोन पिढ्यांचे वैचारिक मतभेद आणि आपुलकी अधोरेखित करण्यात आली असल्यामुळे, हा सिनेमा निव्वळ धम्माल, मस्ती नव्हे, तर नात्यांची भावनिक गुंफणदेखील लोकांसमोर सादर करणारा आहे.
हेही वाचा

असा आहे 'बसस्टॉप' सिनेमाचा ट्रेलर!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा