Advertisement

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच बसमध्ये झाला टीजर पोस्टर लाँच!


SHARES

मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित 'बसस्टॉप' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचं नुकतंच एका हटके अंदाजात टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं. बिनछताच्या 'निलांबरी' बसमध्ये 'बसस्टॉप'च्या संपूर्ण टीमने एकत्र येत सिनेमाचं टीजर पोस्टर लाँच केलं. एवढंच नव्हे तर या बसमधून मुंबईची धावती सफर देखील केली. एकतर 'माय वे' नाहीतर 'हाय वे' हा या टिजर पोस्टरवरील स्लोगन आजच्या तरुणाईची बिनधास्त विचारसरणी व्यक्त करण्यास पुरेसा ठरत आहे. 

तसेच त्यावर पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, रसिका सुनील, अक्षय वाघमारे आणि हेमंत ढोमे हे चेहरे दिसत असून त्यांच्या चित्राखाली बोल्ड, बीजी, रोमान्स, अपॉर्च्युनिटी, चान्स, ब्लफ, अफेअर हे तरुण पिढीतील विविध जीवनशैली मांडणारे शब्द देखील पहायला मिळत आहे. त्यामुळे हा टीजर पोस्टर प्रथमदर्शनी पाहताना 'बसस्टॉप' हा सिनेमा आजच्या लाईफ स्टाईलवर भाष्य करतो, असा अंदाज येतो.

या सिनेमाच्या टीजर पोस्टरवर आजच्या देखण्या आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचे चेहरे जरी दिसत असले तरी, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांच्या देखील यात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत. त्यामुळे हा सिनेमा जुन्या आणि नव्या पिढीच्या विचारसरणीची नवी बाजू मांडणारा ठरणार आहे. या सर्व मल्टीस्टारर्सचा 'बसस्टॉप' सिनेमा येत्या २१ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा