असा आहे 'बसस्टॉप' सिनेमाचा ट्रेलर!

Mumbai
असा आहे 'बसस्टॉप' सिनेमाचा ट्रेलर!
असा आहे 'बसस्टॉप' सिनेमाचा ट्रेलर!
See all
मुंबई  -  

मराठी चित्रपट सृष्टीतील देखण्या आणि प्रसिद्ध स्टारकास्टना एकत्र आणणाऱ्या 'बसस्टॉप' या आगामी सिनेमाचा डिजिटल ट्रेलर नुकताच लाँच झाला. डीजीटलायजेशनच्या युगात व्हायरल झालेल्या या ट्रेलरने अल्पावधीतच रसिकांची वाहवा मिळवली आहे. गणराज असोसिएट्स प्रस्तुत आणि रॅपर श्रेयश जाधव निर्मित या सिनेमाचे समीर हेमंत जोशी यांनी दिग्दर्शन केलं असून, हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील मल्टीस्टारर चित्रपटांच्या यादीत गणला जाणार आहे.

सोशल साईटवर रिलीज झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या टिजर पोस्टरएवढीच प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे कॉलेज तरुणाईवर आधारित असलेल्या या सिनेमात दोन पिढ्यांची विचारसरणी आणि जीवनमान दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणं, मैत्री ट्रेलरमध्ये दिसून येत असून, दुसऱ्या बाजूला पालकांची मानसिकतादेखील यात मांडण्यात आली आहे. तरुण मुला-मुलींचे पालक आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला किती पटतात, याचा उहापोह यामध्ये दिसून येतो. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे अशा तरुण कलाकारांचा ताफा यात दिसत असून, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे ज्येष्ठ कलावंतदेखील या ट्रेलरमध्ये दिसून येतात.

युवा पिढी आणि त्यांचे पालक यांच्यातील वैचारिक दरी आणि त्यावरुन होणारे वाद अगदी विनोदी ढंगात या ट्रेलरमध्ये मांडण्यात आले आहेत. 'बसस्टॉप' या सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीसाठी पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या तिघांनीदेखील महत्वाची भूमिका निभावली आहे. हा सिनेमा २१ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच बसमध्ये झाला टीजर पोस्टर लाँच!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.