• जिना इसिका नाम है...
SHARE

अंधेरी - 'जिना इसिका नाम है' या चित्रपाटातील गाण्यांचा अल्बम लाँच सिनेपोल सिनेमागृहात गुरुवारी झाला. अल्बम लाँचवेळी चित्रपटाच्या निर्माती पौर्णिमा मेड आणि दिग्दर्शक केशव पानेरियासह चित्रपटातील अभिनेते अरबाज खान, आशुतोष राणा, प्रेम चोप्रा, मंंजिरी फडणीस, हिमांश कोहली उपस्थित होते. चित्रपटात एकूण सहा गाणी आपल्याला एेकायला मिळणार आहेत. के.के यांनी चित्रपटातील प्रमुख गाणे 'जिना इसिका नाम है' गायले आहे. अॅश किंग आणि शिल्पा राव यांनी 'कबुल है' हे गाणे गायले. अंकित तिवारी यांनी गायलेले 'मुझको तेरे इश्क मै भिगादे', स्वाती शर्मा यांनी गायलेले 'सोचती हूँ', आकृती कक्करने गायलेलं 'लट्टु', ओमकार मिनास आणि राणी हजारिका यांनी गायलेले 'कागझ सी है जिंदगी' ही गाणी या चित्रपटात आहेत.

हा चित्रपट सर्वसामान्यांना जास्त प्रभावित करणारा असेल कारण चित्रपटाचे प्रत्येक सीन्स खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आणि अनुभवांवर आधारित आहे, असे चित्रपटाच्या निर्माती पौर्णिमा मेड यांनी सांगितले. 3 मार्च 2017 ला 'जिना इसिका नाम है' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या