तुम्ही 'शिव्या' देता का ?

  मुंबई  -  

  तुम्ही शिव्या देता का ? ह्या प्रश्नावर नाही असं उत्तर कोणाकडून मिळणार नाही.

  नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेला 'ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात शिव्या' हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ह्या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा वरळीतल्या सनविला बँक्वेट हॉटेल मध्ये पार पडला. 

   ह्या चित्रपटात दोन गाणी आहेत. नीलेश लोटणकर यांनी लिहिलेल्या टायटल साँग ला  श्रीरंग उर्हेकर यांनी संगीतबद्ध केलं असून अनिरुद्ध जोशी यांनी हे गाणं गायलं आहे. तर रोमँटिक साँग जावेद अली आणि सोनाली दत्ता यांनी गायलं असून, गीतलेखन दीपक गायकवाड आणि संगीत दिग्दर्शन मनोज टिकारिया यांचं आहे.

  'शिव्या' हा प्रत्येकाच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे. प्रत्येकाच्या बोलण्यात कधी ना कधी शिव्या येतातच. सतत शिव्या देणाऱ्या एका माणसाच्या आयुष्यात असा एक प्रसंग येतो, की दुसऱ्या दिवसापासून त्याला शिव्या देता येत नाही. मग त्या माणसाचं काय होतं अशा धमाल संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे. साकार राऊत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  साकार राऊत आणि नीलेश झोपे यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. 

  ह्या सिनेमात भूषण प्रधान आणि संस्कृती पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र पाहायला मिळतील तर तर पियुष रानडे हा पहिल्यांदा व्हिलन च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

  'शिव्या' ही संकल्पना घेऊन एक वेगळ्या धाटणीचं कथानक मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला खरा पण प्रेक्षकांना हा वेगळ्या विषयाचा सिनेमा किती आवडतोय हे २१एप्रिल नंतरच  समजेल. 

  Loading Comments
  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.