'नांदा सौख्य भरे' घेणार निरोप

 Pali Hill
'नांदा सौख्य भरे' घेणार निरोप

मुंबई - कुचकी सासू आणि प्रेमळ समजूतदार सून या अशा नात्यावर आधारित असलेली आणि प्रेक्षकांची आवडती मालिका 'नांदा सौख्य भरे' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका सुरु झाली तेव्हा स्वानंदी अर्थात ऋतुजा बागवे आणि नील अर्थात चिन्मय उदगीरकर या नव्या जोडीने खूप कमी वेळातच प्रेक्षकांची मने जिंकली. पण आता ही जोडी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 2 ऑक्टोबरला झी मराठी वर 'तुझ्यात जीव रंगला' नावाची नवीन मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे ही 'नांदा सौख्य भरे' प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्की झाले आहे.

Loading Comments