Advertisement

जादू नवाजच्या गणेश गायतोंडेची


जादू नवाजच्या गणेश गायतोंडेची
SHARES

नवाजुद्दीन सिद्दीकी आज हिंदी सिनेसृष्टीतील एक हुकूमी एक्का बनला आहे. बायोपीक असो, वा काल्पनिक सिनेमा कोणत्याही भूमिकेत जीव ओतण्याची कला नवाजुद्दीनला चांगलीच आवगत आहे. सध्या नवाजुद्दीन साकारत असलेल्या गणेश गायतोंडेने सर्वांवर जादू केली आहे.


नवाजच्या कलेचं सर्वत्र कौतुक

नवाजुद्दीनने ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्ये साकारलेला गणेश गायतोंडेचं सर्वच स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे. नवाजुद्दीनच्या गणेशने जणू प्रेक्षकांवर जादूच केली आहे. तसं पाहिलं तर कोणतीही भूमिका आज नवाजुद्दीनसाठी कमी महत्त्वाची नाही. तो मोठ्या भूमिकांसाठी जशी मेहनत घेतो तशी लहान भूमिकांसाठीही जीवाचं रान करतो. याच बळावर नवाजुद्दीनने ‘सेक्रेड गेम्स’मधील व्यक्तिरेखा सजीव केली आहे. सर्वसामान्य दिसणाऱ्या व्यक्तीचा दरारा त्याने अगदी सहजपणे दाखवला आहे. नवाजुद्दीनच्या याच कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे.


वास्तव दाखवण्याचा प्रयत्न

‘सेक्रेड गेम्स’मधील सैफ अली खान, राधिका आपटे, नीरज कबी, आमिर बशीर, पंकज त्रिपाठी या कलाकारांमधून नवाजुद्दीनने प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू करण्यात यश मिळवलं आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या वेबसिरीजमध्ये कोणताही आडपडदा न ठेवता वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement