Advertisement

गायक पपोन प्रकरण, एनसीपीसीआर मार्गदर्शक तत्त्वे सुधारणार


गायक पपोन प्रकरण, एनसीपीसीआर मार्गदर्शक तत्त्वे सुधारणार
SHARES

काही दिवसांपूर्वी ‘द व्हाॅइस ऑफ इंडिया किड्स-२’ या रिअॅलीटी शो मधील अल्पवयीन स्पर्धक मुलीचं चुंबन घेतल्याच्या आरोपाखाली परिक्षक गायक पपोन याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर आता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर)ने विविध रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे सुधारण्याचा निर्णय घेतला आहे.

बाल अधिकार संघटनेने गेल्या महिन्यात पपोन आणि अँड टीव्ही या चॅनेलला याबाबत नोटीसही बजावली होती, त्यानंतर गायक पपोनने ‘द व्हाॅइस ऑफ इंडिया किड्स-२’ हा रियालिटी शो सोडला.


'कायद्यात बदल होणार'

एनसीपीसीआरचे अधिकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, 'बदलत्या परिस्थितीनुसार नवीन मार्गदर्शक तत्त्वे कार्यरत करण्यात आली आहेत. बाल न्याय कायदे आणि लैंगिक अपराध या कायद्यातील तरतुदीत बदल होणार आहेत, पण या सगळ्याला वेळ लागेल'.

एनसीपीसीआर समितीने असे म्हटले आहे की, टीव्हीवरील रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धक मुलांना १२ तासांपेक्षा जास्त काळ शूट करण्यासाठी पाठवलं जात असल्याच्या तक्रारी अधिक आहेत. त्यामुळे लवकरच एनसीपीसीआरचे प्रतिनिधी नवीन दिशानिर्देशांच्या अंमलबजावणीवर टीव्ही वाहिन्यांच्या संघटनांशी चर्चा करतील.


हेही वाचा - 

स्पर्धक मुलीचं चुंबन भोवलं, गायक पपाॅनने 'व्हॉईस ऑफ इंडिया'चं परिक्षकपद सोडलं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा