Advertisement

वादामुळे नेटफ्लिक्सने नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी' चित्रपट घेतला मागे

'अन्नपूर्णी' चित्रपटात भगवान राम मांसाहारी असल्याचा दावा रामायणाचा संदर्भ देत दाखवण्यात आला आहे.

वादामुळे नेटफ्लिक्सने नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी' चित्रपट घेतला मागे
SHARES

नयनताराचा 'अन्नपूर्णी' हा चित्रपट नुकताच नेफ्टिक्सवर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये दाखवलेल्या कथेवर लोकांनी आक्षेप घेतला. हिंदू धर्माला दुखावल्याबद्दल या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर विरोध करण्यात आला. त्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला. 

चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांचा संताप उघडपणे समोर आला. वनवासात राम-लक्ष्मण-सीता यांनी मांसाहार केल्याच्या उल्लेखावर नाराजी व्यक्त करण्यात आली. चित्रपटाला होणारा विरोध पाहता नेटफ्लिक्सने घाईघाईने नयनतारा स्टारर 'अन्नपूर्णी' आपल्या व्यासपीठावरून हटवला. लोकांनी हा चित्रपट हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला. या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि 29 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर त्याची स्ट्रीमिंग सुरू झाली होती. OTT वर रिलीज झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर, चित्रपटाला विरोध करण्यात येऊ लागला. 

आता झी स्टुडिओने पत्र लिहून या चित्रपटाबद्दल माफी मागितली आहे. जोपर्यंत हा भाग संपादित होत नाही तोपर्यंत हा चित्रपट ओटीटीवरून हटवण्यात येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. हिंदू किंवा ब्राह्मणांच्या भावना दुखावण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता आणि त्यांनी लोकांच्या दुखापतीबद्दल माफी मागितली आहे, असे या पत्रात लिहिले आहे.

हिंदू आयटी सेलचे संस्थापक रमेश सोलंकी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, या चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.

अभिनेत्री नयनतारा व्यतिरिक्त, जय, लेखक-दिग्दर्शक नीलेश कृष्णा, निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोएंका, झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाची प्रमुख मोनिका शेरगिल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

रमेश सोलंकी यांच्याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे (VHP) प्रवक्ते श्रीराज नायर यांनीही नेटफ्लिक्सला चित्रपट काढून टाकण्याचा इशारा दिला होता.



हेही वाचा

BMC सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्ससाठी कर वाढवण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा