Advertisement

संजय-गौरीची नवी जोडी


संजय-गौरीची नवी जोडी
SHARES

सध्या मराठी रुपेरी पडद्यावर नव्या फ्रेश जोड्यांचा बोलबाला आहे. अशीच एक फ्रेश जोडी आगामी ‘शरयु आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित 'ताटवा' या मराठी सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता संजय शेजवळ व अभिनेत्री गौरी कोंगे या जोडीची लव्ह केमिस्ट्री 'ताटवा' चित्रपटाच्या निमित्ताने रंगणार आहे. चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझारे यांनी केली असून दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केलं आहे. येत्या २६ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रेमाचा अनवट पैलू शोधू पाहणारी ‘लिखित’ व ‘शिल्पा’ची निस्वार्थ निखळ प्रेमकहाणी 'ताटवा'च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तम चित्रकार व शिल्पकार असलेला लिखित (संजय शेजवळ) तसेच छोटी खेळणी बनवून शिक्षण व उदरनिर्वाह पूर्ण करणारी शिल्पा (गौरी कोंगे) हे आपल्यामध्ये असलेल्या सामाजिक दरीची पर्वा न करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांचा हा प्रेमाचा प्रवास नेमकं कोणतं वळण घेतो? याची हृद्यस्पर्शी कथा ताटवा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून चित्रपटातील आमची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल’, असा विश्वास दोघांनी व्यक्त केला.

संजय शेजवळ व गौरी कोंगे या नव्या जोडीसोबत अरुण नलावडे, डॉ. शरयु पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका यात आहेत. २६ मे ला 'ताटवा' प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा