शिवाजी महाराजांवर रॅपसाँग!

 Mumbai
शिवाजी महाराजांवर रॅपसाँग!
Mumbai  -  

मुंबई - 'पुणे रॅप'च्या घवघवीत यशानंतर रॅपर श्रेयश जाधव पुन्हा एकदा रॅपसाँग प्रेक्षकांसमोर घेऊन आला आहे. १५ मार्चला तिथीनुसार झालेल्या शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने या गाण्याचा पहिला टीजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आला होता. त्या दिवसापासून सगळेच जण आतुरतेने त्या पूर्ण गाण्याची आणि व्हीडिओची वाट पाहत होते आणि फायनली तो व्हीडिओ प्रेक्षकांच्या समोर आलाय.

एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध झाले आहे. 'वीर मराठा' या रॅप गाण्याला हर्ष, करण आणि आदित्य यांनी ताल दिला आहे. सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरिओग्राफी केली आहे. या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयशने लिहिले आणि गायले आहे. 

Loading Comments