आदर्श-आनंदी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'

 Mumbai
आदर्श-आनंदी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'
Mumbai  -  

सप्तसूर म्युझिक कंपनी निर्मित आणि मेघा घाडगे अभिनित 'काटाकिर्रर्र' हे गाणं आपल्या चांगल्याच परिचयाचं आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील या गाण्याने गेल्या काही महिन्यातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक मराठी सिनेमांमधून आपण आदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. 'दुनियादारी' या सिनेमातील 'देवा तुझ्या गाभाऱ्याला' गाणं असो किंवा 'दगडी चाळ' मधील 'मोरया' हे गाणं, त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो. 

'कुलदैवत महाराष्ट्राचे' हा सप्तसूर म्युझिक कंपनीचा पहिला वाहिला म्युझिक अल्बम असून यात १५ भक्तीपर गीते सादर करण्यात आली आहेत. खंडोबाचा मंत्र या म्युझिक कंपनीने पहिल्यांदा लोकांसमोर आणला आहे. यानंतर निर्मिती करण्यात आली ती "काटाकिर्रर्र" या म्युझिक सिंगलची.

काटाकिर्रर्रची हीच टीम आपल्यासाठी गणपतीची स्तुती सांगणारं एक गाणं घेऊन येत आहे. गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडका असून त्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. 'मोरया -तुझ्या नामाचा गजर' हे या गाण्याचे नाव असून नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आलं.

गणपतीची स्तुती करणाऱ्या गाण्यात आदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 'दुनियादारी', 'डबल सीट', 'पिंडदान', 'नारबाची वाडी' यांसारख्या सिनेमातून आनंदी जोशींचा मंजुळ आवाज ऐकला आहे, तर आशिष मोरे यांनी शान, कुणाल गांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर काम केले आहे.

Loading Comments