SHARE

मुंबई - कसे आहात सगळे? मजेत ना ? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना ? असा आपुलकीचा प्रश्न विचारत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचाच नाही तर 'झी मराठी वाहिनी'चाही चेहरा बनलेला निलेश साबळे प्रकृती अस्वस्थ्यामुळे काही आठवडे विश्रांती घेणार आहे. 'शो मस्ट गो ऑन' हा आपल्या मनोरंजन इंडस्ट्रीचा आणि कलाकारांचा धर्म. यामुळेच निलेशच्या अनुपस्थितीतही हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. यासाठी अभिनेता प्रियदर्शन जाधव या कार्यक्रमाच्या निवेदनाची सूत्रे सांभाळणार आहे.

मुंबईतील स्टुडिओत चित्रीत होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्ताने विविध शहरांमध्ये गेला आणि गावागावांतील प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वीही ठरला. या लोकप्रियतेची चर्चा अगदी बॉलिवुडमध्येही गेली आणि तेथील दिग्गज कलाकारांनीही या कार्यक्रमात हजेरी लावत आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. हे सर्व करत असताना मागच्या काही दिवसांपासून निलेशला प्रकृती अस्वस्थ्याचा त्रास जाणवत होता. यामुळेच निलेशने वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या