Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री रिता भादुरींचं निधन


ज्येष्ठ अभिनेत्री रिता भादुरींचं निधन
SHARES

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री रिता भादुरी यांचं मंगळवारी निधन झालं. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुजय रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अभिनेते शशिर वर्मा यांनी रिता यांच्या निधनाची बातमी फेसबुकद्वारे दिली. रिता या आपल्यासोबत या जगात नाहीत. आज दुपारी बारा वाजता अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यसंस्काराच्या विधी होतील असं त्यांनी सांगितलं.



या चित्रपटांत केलं काम

६२ वर्षीय अभिनेत्री रिता भादुरी यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. १९९५ मध्ये "राजा" या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पहिला फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. "मै माधुरी दीक्षित बनना चाहती हू" , "क्या कहना" "विरासत" "हिरो नंबर वन" यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. सध्या स्टार भारत चॅनेलवर "निमखी मुखींया" या कार्यक्रमात त्या आजीची भूमिका साकारत होत्या. मात्र त्यांची अनपेक्षित "एक्सिट" सर्वांच्या मनाला चटका लावून गेली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा