Advertisement

ऐश्वर्यामुळे बच्चन कुटुंबीयांकडे यंदा दिवाळी पार्टी नाही!


ऐश्वर्यामुळे बच्चन कुटुंबीयांकडे यंदा दिवाळी पार्टी नाही!
SHARES

बॉलीवुडमध्ये कलाकारांच्या घरात ग्रँड पार्टी करणं काही नवीन नाही. त्यात दिवाळी पार्टी ही नेहमीच खास. त्यातच बच्चन कुटुंबियांच्या घरातली दिवाळी पार्टी ही नेहमीच खास असते. सलमान खान, शाहरूख खान पासून अवघं बॉलीवूड बच्चन कुटुंबाच्या घरी हजेरी लावतं. पण यंदा मात्र तसं होणार नाहीये. यंदा बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी होणार नाहीये. आणि त्याचं कारण त्यांची सून ऐश्वर्या आहे.

ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांचे याच वर्षी मार्च महिन्यात निधन झालं. प्रथेनुसार, राय कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत बच्चन कुटुंबाने यंदा वर्षभर कुठलेही सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा दिवाळी सेलिब्रेशन नसणार आहे. अलीकडे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पार्टीही बच्चन कुुटुंबाने टाळली होती. सगळ्यांबरोबर पार्टी करण्यापेक्षा बच्चन कुटुंबीयांनी मालदीव येथे बिग बींचा वाढदिवस साजरा केला होता.



हेही वाचा

जॉन अब्राहमने रिक्षातून केला प्रवास


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा