सलमानने केलं लुलीयाला बॅन !

 Mumbai
सलमानने केलं लुलीयाला बॅन !
Mumbai  -  

मुंबई - 'सुलतान' म्हणजेच सलमानने गर्लफ्रेंड लुलियाला शूटिंगदरम्यान सेटवर येण्यास बंदी घातल्याची चर्चा सुरू आहे. कारण सलमान सध्या ट्युबलाइट या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ देखील आहे. त्यामुळे दोघींचा सामना होऊ नये यासाठी लुलियाला सेटवर येण्यास नो एन्ट्री असल्याचं बोलंल जात आहे.

ट्युबलाइटच्या चित्रीकरणासाठी सलमान कतरिनासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या दरम्यान लुलियाने अनेकदा तिथला दौरा केला आणि युनिटसह सलमानसोबत वेळ घालवला. पण यावेळी ती सलमानच्या आसपासही फिरकताना दिसत नाही. दोघांमध्ये कॅट फाइट टाळण्याचा प्रयत्न सलमान करत आहे.

Loading Comments