Advertisement

‘बिग बॉस’ च्या सदस्यांना टोचणार ‘बोचरी टाचणी’


‘बिग बॉस’ च्या सदस्यांना टोचणार ‘बोचरी टाचणी’
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरातून रविवारी भूषण कडू बाहेर पडला. बिग बॉसच्या घरातील सर्वांनाच त्याच्या जाण्याचं दु:ख झालं. भूषणच्या गच्छंतीनंतर या आठवड्यामध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करतात ? कोण सुरक्षित राहतात ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस यांनी मागील आठवड्यामध्ये सदस्यांवर “ध्वज विजयाचा उंच धरा रे” हे कॅप्टनसी कार्य सोपवलं होतं. ज्यानुसार जो विजयाचा झेंडा फडकवणार तोच घराचा कॅप्टन होणार होता.पुष्कर नवा कॅप्टन

मागील आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात होते. या तिघांमध्ये सरस ठरत विजयाचा ध्वज फडकवण्यामध्ये पुष्कर यशस्वी ठरला आणि तो घराचा नवा कॅप्टन बनला. सोमवारी बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया सुरु होणार असून, घरातील सदस्य कोणती नवी युक्ती योजणार ? हे पहायला मजा येणार आहे.

बिग बॉस सोमवारी सदस्यांना 'बोचरी टाचणी' हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. यामध्ये बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. तसंच  कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये चर्चा होताना दिसणार आहे. ही बोचरी टाचणी कोणाकोणाला टोचते ते पहायचं आहे.हेही वाचा -

भूषण कडूची ‘बिग बॅास’मधून गच्छंती

जिया बनली डीआयडी लिटील मास्टर्सची विजेती


 

संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा