संस्कारी बाबूजींचा असंस्कारी मुलगा

सांताक्रुझ - संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांचा मुलाने सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत रस्त्यावर धिंगाणा घातला. अलोक नाथ यांचा मुलगा शिवांग रात्री आपल्या मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीतून परतत होता. याचवेळी खार पोलिसांनी ड्रिंक अँड ड्रायव्हच्या मोहिमे अंतर्गत शिवांगची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, गाडी न थांबवता शिवांग ती आणखी वेगात पळवायला लागला. पण, पोलिसांनी त्याला सांताक्रुझ भागात अडवलं. तिथंही मद्यधुंद शिवांगने पोलिसांशी हुज्जत घातली.

रस्त्यावरील या हायहोलटेज ड्रामानंतर पोलिसांनी शिवांग आणि त्याच्या मित्र, मैत्रिणींना ताब्यात घेतलं. पण त्याच्या मैत्रिणींनी पोलीस स्टेशनमध्येही वाद घालायला सुरुवात केली. पोलिसांनी शिवांगची गाडी जप्त केली. त्याचाडकून 2 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करून सोडून दिलं. पण तरीही त्याची गुरमी काही कमी नाही झाली. जाता जाता ही पोलीस स्टेशनच्या बाहेर तो शिवीगाळ करत होता. ऐवढा तमाशा केल्यानंतर मात्र संस्कारी बाबूजींच्या या असंस्कारी मुलावर चेहरा लपवण्याची वेळ आली. त्यामुळे हे पाहून संस्कारी बाबूजी का लाडला बिगड गया असच म्हणावं लागेल.

Loading Comments