आयएनटी झाली बोल्ड

 vile parle
आयएनटी झाली बोल्ड

विले पार्ले - यंदा आयएनटीच्या स्पर्धेत सादर केलेल्या अनेक एकांकीकांमध्ये बोल्ड सादरीकरण करण्यात आले आहे. 'द लास्ट ट्राय' ही एकांकीका सर्वांसाठीच चर्चेचा विषय ठरत आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या पहिल्याच दिवशी कीर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या बोल्ड एकांकीकेने सर्वांना मोहून टाकले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सिगारेट आणि मद्य प्राशन करतानाचे प्रसंग दाखवण्यात आले आहे. पण महाविद्यालयीन स्तरावर अशा बोल्ड सादरीकरणाला खरेच मान्यता आहे का? असेल तर किती प्रमाणात ती मान्यता आहे?, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले. सध्या रंगमंचावर शिव्यांचा वापर होणे ही बाब जुनी होत आहे. पण याचा परिणाम पुढे बोल्ड सादरीकरणावर झाले आहेत. डहाणूकर महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकीकेत बोल्ड दृश्य जरी दिसले नसले तरी संवादांच्या प्रभावी माऱ्यात बोल्ड लिखाण दिसले होते. पण सादरीकरणात खरच या गोष्टींची गरज आहे का? याबाबत जाणकरांना विचारले असता, असे प्रसंग टाळले गेले तरच बरे, अशी भूमीका प्राध्यापिका डॉ. मनाली लोंढे यांनी मांडली.

Loading Comments