अविस्मरणीय ओम पुरी...

Pali Hill
अविस्मरणीय ओम पुरी...
अविस्मरणीय ओम पुरी...
अविस्मरणीय ओम पुरी...
अविस्मरणीय ओम पुरी...
अविस्मरणीय ओम पुरी...
See all
मुंबई  -  

मुंबई - जबरदस्त अभिनयानं चित्रपटांचा पडदा गाजवणाऱ्या ओम पुरींचं आयुष्यही वादग्रस्त होतं. अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रवाहाविरुद्ध पोहताना मागे-पुढे पाहिलं नाही. पण चित्रपटांत अनेक दमदार एंट्री घेणाऱ्या ओम पुरींची एग्झिट मात्र अचानक झाल्यानं धक्कादायकच ठरली. 

ओम पुरींनी आपल्या जबरदस्त अभिनयानं अनेक चित्रपट गाजवले. त्यातल्याच या काही आठवणी - 

- अर्धसत्य चित्रपटात कविता ऐकवणारे ओम पुरी. अभिनेता म्हणून त्यांनी स्वत:ला या भूमिकेतून सिद्ध केलं. 

- ओम पुरी आणि नसिरुद्दीन शाह यांनी अनेकदा चित्रपटांत एकत्र काम केलं. भारद्वाज यांच्या मकबूल या चित्रपटात त्यांची सुपरहिट जोडी होती. 
- ओम पुरींनी पडद्यावरही अनेकदा बंडखोर भूमिका केल्या. माचिस या चित्रपटातून त्यांनी समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.
- तमस या मालिकेद्वारे ते फक्त प्रेक्षकांपर्यंत नाही तर घराघरांपर्यंत पोहचले.
- धूप चित्रपटात समाजव्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या एका लाचार पित्याची त्यांची भूमिका गाजली. 
- हेराफेरी या विनोदी चित्रपटातला त्यांचा खडकसिंह अविस्मरणीयच.
- ओम पुरी यांनी अनेक हॉलिवुड चित्रपटांतही काम केलं. ऑस्कर विजेत्या हेलन मिरन यांच्याबरोबरचा त्यांचा द हंड्रेड फुट जर्नी हा चित्रपटही गाजला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.