Advertisement

संगीतकार नंदू होनप यांच्या प्रथम स्मृतीदिनी अनोखी सुरांजली


संगीतकार नंदू होनप यांच्या प्रथम स्मृतीदिनी अनोखी सुरांजली
SHARES

दिवंगत संगीतकार नंदू होनप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी म्हणजेच १८ सप्टेंबर २०१७ रोजी ‘सारे संगीतकार’ या ऐतिहासिक गाण्याचा जन्म होतोय. आपल्या वडिलांना या गाण्याच्या माध्यमातून सुरांजली अर्पण करावी असा मानस नंदू होनप यांचे सुपूत्र स्वरूप नंदू होनप यांचा आहे. यानिमित्ताने एक अनोखी संकल्पना घेऊन ते एक अभिनव कलाकृती संगीतकाराच्या भूमिकेतून रसिकांसाठी सादर करणार आहेत.



या गाण्याचे गीतकार प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांचे सुपूत्र आदित्य दवणे हे असून नंदू होनप यांच्यासोबत त्यांनीही गीतकाराच्या रूपाने पहिल्यांदाच संगीतसृष्टीत पदार्पण केलं आहे. या गाण्यामध्ये पं. यशवंत देव, पं. अजित कडकडे, अशोक पत्की, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर अशा आठ मातब्बर संगीतकारांचा गायक म्हणून सहभाग आहे. या गाण्यामध्ये ग्रुप व्हायोलीन, सितार, तबला, मेंडोलीन अशा अॅकॅास्टिक वाद्यांचाही वापर करण्यात आला आहे.



१८ सप्टेंबर २०१७ रोजी यू ट्यूबवर या गाण्याचे अनावरण "SNH MUSIC" नामक चॅनलवर होईल आणि त्यानंतर ते प्रेक्षकांना ऐकता आणि पाहता येईल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा