Advertisement

‘बिग बॅास’मध्ये नंदकिशोर बनणार हुकुमशाह


‘बिग बॅास’मध्ये नंदकिशोर बनणार हुकुमशाह
SHARES

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये सोमवारी सदस्यांना “बोचरी टाचणी” हे नॉमिनेशन कार्य सोपवलं. यामध्ये बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं. यावेळी कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये बरीच चर्चा झाली. या कार्यामध्ये मेघा, आस्ताद, सई, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे नॉमिनेट झाले. त्यानंतर ‘बिग बॉस’ यांनी पुष्करला एक विशेष अधिकार दिला, ज्याद्वारे तो नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याला सुरक्षित करू शकतो. पुष्करने सईला सुरक्षित केलं.


रेशम नॉमिनेट

याखेरीज पुष्करला आणखी एक अधिकार दिला आहे. या अधिकारानुसार त्याला एकाला घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करायचं होतं. त्याने रेशमला नॉमिनेट केलं. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण सुरक्षित होणार? आणि कोण घराबाहेर हे बघणं रंजक असणार आहे. मंगळवारी बिग बॉस सदस्यांना “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सोपवणार आहेत. यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह बनणार आहे. घरातील इतर सदस्य नंदकिशोरची प्रजा असेल. आता “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये काय घडणार? कोणाचा संयम सुटणार? कोण संयमाने खेळणार? हे पाहायला मिळेल.हेही वाचा -

बूट पॉलिश करणाऱ्या मुलांना शरद पवारांच्या हस्ते आर्थिक मदत

मकरंदच्या ‘यंग्राड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा