Advertisement

मकरंदच्या ‘यंग्राड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक मकरंद मानेचा ‘यंग्राड’ हा आणखी एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

मकरंदच्या ‘यंग्राड’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

‘रिंगण’ या मराठी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक मकरंद मानेचा ‘यंग्राड’ हा आणखी एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

मकरंदसोबत निर्माते विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता, गौरव गुप्ता आणि मधु मंटेना उपस्थित होते. ‘यंग्राड’ चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सने करण्यात आली आहे. ६ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात चार उनाड मुलांची कथा पाहायला मिळेल.


चित्रपटात 'यांची' भूमिका

चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात आहेत. त्याशिवाय शरद केळकर, सविता प्रभुणे, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, विठ्ठल पाटील आणि शंतनू गणगणे यांच्याही भूमिका आहेत.


चित्रपटाची कथा?

‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून, तो नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणं किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणं यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचं आयडॉल समोर असल्यानं हे चौघेही नेहमीच अडचणीत सापडतात.

‘यंग्राड’चा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आणताना अत्यंत आनंद होत असल्याचं विठ्ठल पाटील म्हणाले. तर ‘यंग्राड’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताना विशेष आनंद होत असल्याचं मत मधु मंटेना यांनी व्यक्त केलं. फ्युचरवर्क्सचा हा चित्रपटनिर्मितीतील पहिलाच प्रयत्न असून, प्रेक्षकांना आवडेल अशी आशा गौतम गुप्ता यांनी व्यक्त केली.


हेही वाचा -

चार उनाड पोरांची कथा 'यंग्राड'

मैत्रीवर आधारित ‘दोस्तीगिरी’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा