दादर - उत्तुंग या खुल्या एकांकीका स्पर्धेची प्राथमिक फेरी 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणाराय. शिवाजी मंदिर जवळील यशवंत नाट्य मंदिर तालीम हाँलमध्ये ही स्पर्धा होणाराय. या स्पर्धेचं यंदा आठवं वर्ष आहे. रचना कला केंद्र आणि अनिरुद्ध थिएटर्सनं या स्पर्धेचं आयोजन केलंय. या प्राथमिक फेरीत 36 एकांकीका सादर होणार आहेत. त्यापैकी पाच किंवा सहा एकांकीका अंतिममध्ये जातील असं आयोजकांनी सांगितलं.