लक्षवेधी हलते नेपथ्य

प्रभादेवी - एकांकिका स्पर्धेत बक्षिस पटकावण्यात सातत्य राखणारी आणि जनमानसांत प्रभाव टाकणारी झिरो बजेटची एकांकिका ओवी. अनिकेत पाटील दिग्दर्शित या एकांकिकेचं वैशिष्ट्य म्हणजे यात वापरलेले हलते नेपथ्य. उत्तम प्रकाश योजना, त्याला मिळणारी उत्तम संगीताची साथ आणि सस्पेंस थ्रिलर अशा आगळ्या-वेगळ्या गोष्टी या एकांकिकेला वेगळ्या उंचीवर नेतात. महाविद्यालयिन स्तरावर असे प्रयोग कमीच होतात. किंबहुना होतच नाहीत. पण या द्वारे पहावयास मिळालेला हा एक हलत्या नेपथ्यांचा थरार सर्वांना नेहमी लक्षात राहील, यात काही वाद नाही.

Loading Comments