Advertisement

ब्लीडिंग राणी आणि अक्षय कुमार!


ब्लीडिंग राणी आणि अक्षय कुमार!
SHARES

मासिक पाळी या महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्यावर भाष्य करणारा पॅडमॅन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कोणतीही उणीव सोडत नाही. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो वेगवेगळे प्रयोग करत आहे. नुकतचं 'पॅडमॅन'च्या टीमने फेसबुक लाइव्ह करत 'ब्लीडिंग रानी' ही कविता सादर केली.

प्रसिद्ध यू ट्यूब  ब्लॉगर अरण्या जौहर हिच्याबरोबर ब्लीडिंग रानी ही कविता अक्षयने फेसबुक लाईव्हवर सादर केली. आणि काही मिनिटांतच या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं देखील, आणि उत्तम प्रतिसादही दिला!




काय आहे या कवितेत?

या कवितेत महिला सक्षमीकरणाच्या मुद्यापासून ते मासिक पाळीपर्यंत विषयांवर भाष्य केलं आहे. मासिक पाळीच्या दिवसांत मुलींवर कशाप्रकारे निर्बंध लादले जातात, ही बाब या कवितेत अतिशय सूचक पद्धतीने मांडण्यात आली आहे. ही कविता ऐकताना 'आज कर्फ्यू लगा बाजार में मेघा को पिरियड्स आए स्कूलिंग गई भाडमे' ही ओळ आजही आपली विचारसरणी किती खालावली आहे, यावर विचार करायला भाग पाडते.

आजपर्यंत समाजात महिला काय आहेत? हे कोणालाच कळलेलं नाही, आणि कळणारही नाही, ही खंत या कवितेतून व्यक्त केली आहे. याचप्रमाणे पाळी आलेल्या दिवशी, डाग लागल्यावर मुलींना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, याचं समर्पक वर्णनही या कवितेत केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा