वरळी - येथील नेहरु सेंटरमध्ये 4 चित्रकारांनी एकत्र येऊन एक चित्रप्रदर्शन भरवले आहे. भालचंद्र मांडके, प्रदीप सरकार, पार्था दास आणि विनय साने या 4 चित्रकारांच्या एकूण 32 चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून, हे प्रदर्शन 24 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान भरवण्यात आले आहे. यामध्ये ठेवण्यात आलेल्या चित्रांच्या किमती 15 हजारांपासून 90 हजार रुपयांदरम्यान आहेत.
प्रदीप सरकार हे झारखंडचे चित्रकार आहेत. त्यांनी रांची विद्यापीठीतून वाणिज्य शाखेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ब्रिटीश इंस्टिट्यूट मुंबई येथून फाइन आर्टचा डिप्लोमा केला. आतापर्यंत त्यांनी 5 सोलो प्रदर्शने आणि 35 ग्रुप शो केले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या अनेक शोमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या कलाकृतींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे पेंटींग ललीत कला आकादमी भुवनेश्वर, लोढा फाउंडेशन मुंबई अशा काही ठिकाणी लावण्यात आली आहेत. चित्रकार पार्था दास यांच्या चित्रातून आपल्याला मानवी शरीराच्या आकृत्या दिसतात. ह्युमन फिगर पेंटींग पहायला मिळतात. विनय साने यांच्या चित्रातून आपल्याला निसर्ग आणि लॅन्डस्केपचे अमूर्त स्वरुप दिसून येते. चित्रकार भालचंद्र मांडके हे भारतातल्या सुप्रसिद्ध असलेल्या चित्रकारांपैकी एक नाव आहे. त्यांच्या चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मांडके यांची चित्रे कायमस्वरुपी ललितकला अकादमी आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्ड आर्ट येथे लावण्यात आलेली आहेत.