Advertisement

नेहरू सेंटरमध्ये चित्रांचे प्रदर्शन


नेहरू सेंटरमध्ये चित्रांचे प्रदर्शन
SHARES

वरळी - येथील नेहरू सेंटरमध्ये चित्रकार अनंत डेरे यांच्या चित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनात 50 चित्रांचा समावेश आहे. 10 हजारांपासून ते 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंतच्या चित्रांचा यात समावेश आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेली चित्रे माणसाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि त्यामध्ये असलेला जिव्हाळा दर्शवतात. हे प्रदर्शन विनामूल्य असून 23 जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे.

चित्रांच्या विक्रीतून मिळणारा मोबदला सामजिक संस्थाना दान केला जाणार आहे. कारगिलमधील सैनिकांच्या नातेवाईकांना ही चित्रे विकून आर्थिक मदत केली जाते. मुंबईमधलं हे तिसरं चित्रप्रदर्शन आहे. तरुणाईचा उत्तम प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभत आहे. त्यामुळे हे पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया अनंत डेरे यांनी व्यक्त केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा