'पठार'ची कान्स महोत्सवासाठी निवड

 Mumbai
'पठार'ची कान्स महोत्सवासाठी निवड

मुंबई - जगभरातील दर्जेदार चित्रपटांचं हक्काचं व्यासपीठ समजला जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याचा मान ‘पठार’ या मराठी लघुपटाला मिळाला आहे. निखिलेश चित्रे दिग्दर्शित 'पठार'ची कान्स महोत्सवासाठी निवड झाली आहे. राहुल तिवरेकर, तुषार पवार, केवल नागवेकर, हरिता पुराणिक आदींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या लघुपटाचं ‘थर्ड आय’ चित्रपट महोत्सवात रसिकप्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. सतीश तांबे यांच्या ‘पठारावर अमर’ या कथेवर ‘पठार’ हा लघुपट आधारीत आहे. कान्स चित्रपट महोत्सवापर्यंत मुसंडी मारणारा 'पठार' मुंबईतल्या सर्वसामान्य चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी आता निर्मात्यांनी सुरू केली आहे.

Loading Comments