छोट्या ‘लायन’ने घेतली पॉवरफुल शरद पवारांची भेट

 Mumbai
छोट्या ‘लायन’ने घेतली पॉवरफुल शरद पवारांची भेट

मुंबई - लायन चित्रपटामध्ये लहान मुलाची भूमिका करणारा सनी पवार याचे कौतुक सर्वांकडून होत आहे. प्रसिद्धीचे केंद्र बनलेल्या सनी पवार याने राजकारणातील पॉवरफुल्ल व्यक्तीमत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट यशवंतराव चव्हाण केंद्रात घेतली. अमेरिकेमध्ये ऑस्कर अॅवॉर्ड कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला सनी पवार बुधवारी मुंबईत परतला. शरद पवार यांनी हॉलिवूडच्या चित्रपटात केलेल्या कामासाठी सनी पवारचे कौतुकही केले. तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. सनी याच्या अभिनयामुळे हॉलिवूडपासून ते मुंबईपर्यँत त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

Loading Comments