'मिडियापासून दूर रहा'


  • 'मिडियापासून दूर रहा'
SHARE

मुंबई - 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या वादानंतर शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटाच्या निर्मात्यांनी धास्ती घेतलीय. चित्रपटासंदर्भातील कुठलीच माहिती लिक होऊ नये म्हणून निर्मात्यांनी अजब फतवाच काढलाय. 'रईस'च्या निर्मात्यांना चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारापासून ते क्रु मेंबरपर्यंत सर्वांकडून एक करारांवर स्वाक्षरी घेण्यात आलीय. या करारानुसार चित्रपट रिलीझ होईपर्यंत क्रु मेंबर आणि कलाकार मिडियाशी बोलणार नाहीत. 'रईस' या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान झळकणाराय. त्यामुळे 'रईस' चित्रपटावरूनही पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन निर्मात्यांकडून खबरदारी घेतली जातेय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या