SHARE

पॉप संगीतातील हुकमी नाव अशी जस्टिन बिबरची ओळख. जस्टिन बीबर १൦ मेला भारतात येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहेच, शिवाय बी टाऊनमध्येही भलताच उत्साह पाहायला मिळत आहे. आता जस्टिन बीबर भारतात येणार म्हटल्यावर त्याच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव होणार यात काही शंकाच नाही. श्रद्धा कपूरपासून ते सोनाक्षी सिन्हापर्यंत सर्वच जस्टिनच्या स्वागताची जोरदार तयारी करत आहेत. मग जस्टिनच्या स्वागतासाठी बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि निर्माता कजो कसा मागे राहिल?. जस्टिन बीबरला तुम्ही लवकरच 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या पर्वात पाहू शकता. 'कॉफी विथ करण'चा पाचवा सिजन लवकरच संपणार आहे. त्यामुळे 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या पर्वाची सुरुवात जस्टिन बीबरच्या उपस्थितीत होईल, अशी चर्चा आहे.

करण जोहरनं आत्तापर्यंत त्याच्या या कार्यक्रमात बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत. करण जोहरची प्रश्न विचारण्याची अनोखी शैली आणि सेलिब्रिटींची मजेशीर उत्तरं यामुळे 'कॉफी विथ करण' हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याआधीही 'कॉफी विथ करण'मध्ये रिचर्ड गेरे, मारिया शारापोव्हा, ह्यू जॅकमन यांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यामुळे जस्टिन भारतात आल्यानंतर त्याच्या बीझी शेड्यूलमधून वेळ काढून 'कॉफी विथ करण'मध्ये सहभागी होईल की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या