Advertisement

शिव-गौरीची प्रेमकथा फुलणार नयनरम्य स्वित्झर्लंडमध्ये


शिव-गौरीची प्रेमकथा फुलणार नयनरम्य स्वित्झर्लंडमध्ये
SHARES

मुंबई - उत्तर भारतीय शिव आणि महाराष्ट्राची लेक गौरी यांच्या प्रेमकथेला म्हणजेच झी मराठीवरील काहे दिया परदेस मालिकेला रसिकांनी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतले. या मालिकेचा नायक शिव आणि नायिका गौरी हे तर तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले. आंतरप्रांतीय जोडीच्या या प्रेमकथेला रसिकांनी नेहमीच दाद दिली. कारण दोन संस्कृतीचा, दोन परंपरांचा उत्कृष्ठ मिलाफ या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता आला. मग ते शिवचे मुंबईत येऊन राहणे असो, दोघांचे प्रेमात पडणे असो, दोघांच्या घरून लग्नाला संमती मिळवण्यासाठीची कसोटी असो किंवा मुंबईच्या गौरीने बनारसच्या सासरच्यांना प्रेमाने जिंकणे असो. सगळ्या टप्प्यांवर शिव गौरी यशस्वी ठरले. अखेर दोघांचं लग्न तर झालं. पण प्रेमकथेच्या या वेगवेगळ्या संघर्षमय वाटेवर वाटचाल करत असताना शिव गौरी हळूवार प्रेमाच्या क्षणांपासून दुरावले होते. पण दोघांची प्रेमकथा आता बहरणार आहे. तेही पृथ्वीतलावरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंड येथे. झ्युरिक, माऊंट टिटलीज, एंगलबर्ग, युफ्रा, ल्युसन अशा एकाहून एक सरस ठिकाणं चित्रपटात रसिकांनी पाहिली होती. ते अद्भुत निसर्ग सौंदर्य आणि त्यांच्या साक्षीने रंगणारी शिव गौरीची प्रेमकथा आता झी मराठीवर काहे दिया परदेस मालिकेत येत्या 9 जानेवारीपासून रात्री 9 वा. प्रेक्षकांना पहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा