Advertisement

'छंद प्रितीचा' चित्रपटाचं पोस्टर लाँच


'छंद प्रितीचा' चित्रपटाचं पोस्टर लाँच
SHARES

आपल्या प्रत्येकाला काही ना काही करण्याचा छंद असतो. मग तो छंद शिंपल्या गोळा करण्याचा असो किंवा जुन्या नोटा, पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा असो किंवा आपल्या आवडत्या नटाचे फोटो गोळा करण्याचा. मात्र ज्यांना प्रितीचा छंद जडतो त्यांचं काय?

प्रितीचा छंद जडलेल्या अशाच दोन जीवांची कथा सांगणारा नवा सिनेमा 'छंद प्रितीचा' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.

या सिनेमाचं पोस्टर पाहिलं की 'पिंजरा', 'सांगत्ये ऐका'सारख्या चित्रपटांची आठवण होते. तमाशावर आधारित गावापासून ते शहरी माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव ही कलाकार मंडळी आहेत.



हेही वाचा

'विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाचं म्युझिक लाँच


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा