Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

'विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाचं म्युझिक लाँच


SHARES

'विठ्ठला शप्पथ या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सिनेमाच्या म्युझिक टीमने संगीत निर्मितीचे उलगडलेले सुखद अनुभव, तसेच कलाकारांनी सादर केलेल्या स्कीटसने या सोहळ्याची रंगत चांगलीच वाढवली! 'विठ्ठला शप्पथ या चित्रपटातही सुमधुर गीतांची मेजवानी आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठू माऊलीचे दर्शन आजवर अनेक चित्रपटांतून करण्यात आले आहे. 'विठ्ठला शप्पथ चित्रपटातून विठू माऊलीचं त्यांच्या भक्तांशी असलेलं अतूट नातं पहायला मिळणार आहे.

मंगेश कागणे व क्षितीज पटवर्धन या लोकप्रिय गीतकारांच्या शब्दांनी यातील चारही गीते सजली असून चिनार-महेश या युवा संगीतकार जोडीचा संगीतसाज या गीतांना लाभला आहे. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे, गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘ठाई ठाई माझी विठाई’, तसेच आदर्श शिंदे यांनी गायलेलं ‘देव कोंडला’ हे भक्तिगीत प्रेक्षकांना समाधानाची अनुभूती देईल. स्वप्नील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजातील ‘बोले तुना तुना’ हे प्रेमगीत व ‘झक्कास छोकरा’ हे प्रवीण कुँवर यांनी स्वरबद्ध केलेलं धमालगीत नक्कीच ठेका धरायला लावणार आहे.

विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही नायक-नायिकेची नवी जोडी या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे.१५ सप्टेंबरला 'विठ्ठला शप्पथ प्रदर्शित होणार आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा