मालाडमध्ये भव्य समाज प्रबोधन महोत्सव

 Kurar Village
मालाडमध्ये भव्य समाज प्रबोधन महोत्सव
Kurar Village, Mumbai  -  

कुरारगाव - कुरारगावातील कोकणीपाड्यात पंपहाऊस येथे जीवनविद्या मिशन मालाड पूर्व शाखेअंतर्गत भव्य समाज प्रबोधन महोत्सव साजरा होणार आहे. 3 ते 4 डिसेंबरला हा भव्य समाज प्रबोधन महोत्सव साजरा होणार आहे. विकासाला विवेकाची जोड देणाऱ्या जीवनविद्या मिशनच्या निरपेक्ष कार्याला 60 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत या महोत्सवाच आयोजन करण्यात आलं. 3 डिसेंबरला संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत उपासना यज्ञ, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधक दशरथ शिरसाट यांचे प्रबोधन विवेचन होणार आहे. तर रविवारी संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत संगीत जीवनविद्या, बाल संस्कार केंद्रातील कार्यक्रम, प्रबोधक अशोक नाईक यांचे प्रबोधन विवेचन होणार आहे. तसेच जीवनविद्या काळाची गरज या विषयावर देखील प्रबोधन होणार आहे. विभागातील नागरिकांना विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आलाय. नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन जीवनविद्याच्या प्रसाद परब यांनी केलंय.

Loading Comments