'फुगे' सिनेमाचं प्रदर्शन लांबवलं

Pali Hill
'फुगे' सिनेमाचं प्रदर्शन लांबवलं
'फुगे' सिनेमाचं प्रदर्शन लांबवलं
See all
मुंबई  -  

मुंबई - मराठी सिनेमा फुगे च्या रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचं सिनेमाच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आलंय. २ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार होता.

अश्विन अंचन यांची निर्मिती आणि माय प्रोडक्शनच्या अनुराधा जोशी तसंच जीसिम्सचे अर्जुन सिंग बऱ्हान आणि कार्तिक निशानदार यांची सहनिर्मिती असलेला 'फुगे' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होईल. नोटाबंदीच्या या धोरणाचा परिणाम थोड्याफार प्रमाणात का असेना पण मनोरंजन क्षेत्रावर देखील पडला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हा बदल भारताचे भविष्य घडवण्यास महत्वाचे ठरणार असल्याकारणाने आम्ही त्याचे स्वागत करत असल्याचे जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन सिंग बऱ्हान यांनी सांगितले. तसंच 'फुगे' हा सिनेमा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता ते सहज शक्य नाही. अशावेळी कोणताही सिनेरसिक 'फुगे' सिनेमा पाहण्यापासून वंचित राहू नये, यासाठी सिनेमाच्या निर्मात्यांनी विचार करून सिनेमाचे प्रदर्शन पुढे लांबवले आहे, असं ही ते म्हणाले .

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.