Advertisement

सेक्रेड गेम्समध्ये राधिका आपटे पुन्हा दिसणार


सेक्रेड गेम्समध्ये राधिका आपटे पुन्हा दिसणार
SHARES

नेटफ्लिक्सवर सर्वाधिक गाजलेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या दुसऱ्या भागावर काम सुरू आहे. पहिल्या भागामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकी, अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राधिका आपटे यांनी आपल्या भूमिकेच्या जोरावर लोकांची मनं जिंकली होती. पहिल्या भागामध्ये राधिकाचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. परंतु आता दुसऱ्या भागात देखील ती दिसण्याची शक्यता आहे.


८ एपिसोड 

'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागात राधिकानं रॉ एजंट अंजली माथूरची भूमिका साकारली होती. परंतु पहिल्या भागात तिचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे ती दुसऱ्या भागात दिसणार की नाही यावर संशय होता. परंतु एका मुलाखतीदरम्यान तिने आपण दुसऱ्या भागातही दिसू असा सूचक इशारा दिला आहे. दुसऱ्या भागामध्ये फ्लॅशबॅकचे काही दृश्य असणार आहेत. यामध्ये राधिका दिसण्याची शक्यता आहे. 'सेक्रेड गेम्स'चा दुसरा भाग २०२० मध्ये येण्याची शक्यता आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही ८ एपिसोड असण्याची शक्यता आहे.
संबंधित विषय
Advertisement