Advertisement

'रईस'ला चांगली ओपनिंग मिळणार ?


'रईस'ला चांगली ओपनिंग मिळणार ?
SHARES
Advertisement

मुंबई - या वर्षीचे सर्वात चर्चेत असणारे रईस आणि काबील हे दोन चित्रपट बुधवारी देशभर प्रदर्शित होत आहेत. किंग खान शाहरुख आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेले हे दोन चित्रपट परस्परांशी दोन हात करीत असल्यामुळे त्यात नेमकी बाजी कोण मारणार याकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शाहरुखच्या गेल्या काही चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवरील आढावा घेतला असता त्याची जादू कमी होत असल्याचे दिसते. त्याच्या यापूर्वीच्या दिलवाले आणि फॅन या दोन चित्रपटांना पहिल्या दिवशी 20 कोटींचा टप्पाही पार करता आला नव्हता. दिलवाले आणि बाजीराव मस्तानी हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याचा फटका तेव्हा दिलवालेला बसला होता. तसाच काहीसा प्रकार यावेळी रईसबाबतही घडणार असल्याची माहिती चित्रपटसृष्टीतील वितरकांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही चित्रपट साधारणपणे दोन हजार स्क्रीन्सद्वारे प्रदर्शित होतील. आगाऊ तिकीटविक्रीचे आकडे आणि प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता पाहता रईसचा पहिल्या दिवशी 18 ते 20 तर काबीलचा 13 ते 14 कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. रईसचे बजेट 70 कोटी तर काबीलचे 50 कोटी आहे. या बजेटमध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांच्या मानधनाचा समावेश करण्यात आलेला नाही.

संबंधित विषय
Advertisement