ड्रेसवर पंतप्रधान, राखी सावंतवर गुन्हा

मुंबई - अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस घातला होता. त्यामुळे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील कांकरोली पोलिसात पंतप्रधानांचा अपमान केल्याच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टाच्या आदेशनंतर कांकरोली पोलिसांनी ही कारवाई केली. तर राखीनं याला प्रत्युत्तर म्हणून एक व्हीडिओ रेकॉर्ड केलाय. ज्यात तिनं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक असल्याचं सांगितलंय आणि म्हणून आपण हा ड्रेस घातल्याचं सांगितलंय. तिचा हा व्हीडिओ व्हायरल झालाय. 

Loading Comments