Advertisement

'निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं सोईस्कर' - राम कपूर


'निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं सोईस्कर' - राम कपूर
SHARES

आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना सामोरे जाताना नेमकं असे काही निर्णय आपल्याला घ्यावे लागतात ज्याचा परीणाम आपल्याबरोबर इतरांवरही होत असतो, असंच काहीसं सोनी टीव्हीवर येणाऱ्या 'जिंदगी के क्रॉसरोड' या शो मध्ये दाखवलं जाणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अभिनेता राम कपुर करणार असून 'रोजच्या आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे आणि निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं सोईस्कर हाच या शोचा मुख्य हेतु असल्याचं राम म्हणाला. 


पत्रकार परिषदेत राम म्हणाला...

'भारतात पहिल्यांदाच एका वेगळ्या विषयावर शो येत आहे. तारखांच्या व्यस्ततेमुळे सुरुवातीला या शोसाठी तयार नव्हतो. मात्र शबिना यांनी अगदी 10 मिनिटांत या शोबद्दलची संकल्पना सुचवली आणि हा शो करण्याची तयारी दर्शवली. मला अतिशय आंनंद होत असल्याचं राम पत्रकार परिषदेत म्हणाला.

'याशोसाठी कुठलीही स्क्रिप्ट तयार केली नाही. हा शो पूर्णपणे ऊत्स्फूर्त असा आहे. कारण स्टुडिओमधील प्रेकक्षकांच्या काय प्रतिक्रिया येणार हे कुणालाही ठाऊक नव्हतं. रोजच्या आयुष्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे आणि निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं सोईस्कर हाच या शोचा मुख्य हेतु आहे. उद्भवलेल्या प्रश्नांवर ऊत्तर सांगणे हे आमचं काम नाही तर दोन ऊत्तरांतील योग्य पर्याय निवडण्यासाठी लोकांना मदत करणार असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.  

जिंदगी के क्रॉसरोड हा शो 6 जून 2018 बुधवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता सुरू होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा