Advertisement

कंगना झाली आई, पण...


कंगना झाली आई, पण...
SHARES

अगदी बरोबर वाचलंत तुम्ही. हो कंगना आई झाली आहे. पण यात थोडं ट्वीस्ट आहे ते म्हणजे कंगना तिच्या आगामी चित्रपटात आई झाली आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना नेहमीच वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसते. मणिकर्णिकामध्ये तिनं आईची भूमिका साकारली होती. आता ती पुन्हा एकदा आईची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कंगनाच्या आगामी चित्रपटाबद्दल तिची बहिण रंगोली चंदेलनं या संदर्भात ट्वीट करत खुलासा केला आहे. फोटो शेअर करताना रंगोलीनं लिहिलं की, कंगना म्हणते 'जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला आईची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात येतं तेव्हा तो तिचा अपमान असतो'. पंरतू 'मणिकर्णिका'मध्ये आईची भूमिका यशस्वीरित्या साकारल्यानंतर कंगना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आई साकारताना दिसणार आहे. यशाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री आईची भूमिका साकारत आहे. हा नवा भारत आहे; ज्याला 'पंगा' घ्यायला आवडतं, असं रंगोलीनं म्हटलं आहे.

कंगनाच्या आगामी चित्रपट 'पंगा' असल्याचं खुद्द रंगोलीनं सांगितलं. 'पंगा' हा चित्रपटत येत्या २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी करणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात रिचा चड्ढा, नीना गुप्ता, जस्सी गिल आणि पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकेत असणार आहेत.

कंगनाचा पंगा चित्रपटाचा ट्रेलर २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. बुधवारी कंगनानं इन्स्टावर एक कविता शेअर करत ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. कविता सोबतच अश्विनी अय्यर यांची स्वाक्षरी आहे.



हेही वाचा

'हा' बॉलिवूड कलाकार साकारणार सुपरहिरोची भूमिका

आता रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ- फरहान अख्तर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा