Advertisement

कोरियोग्राफर विरोधात मॉडेलची बलात्काराची तक्रार


कोरियोग्राफर विरोधात मॉडेलची बलात्काराची तक्रार
SHARES

चारकोप - एका मॉडेलने कोरियोग्राफर विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. राजेंद्र प्रसाद उर्फ रिक्की असे या कोरीयोग्राफरचे नाव आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये कोरियोग्राफरचे काम केले आहे.

ही मॉडेल आपल्या काही मित्रांसोबत राहत होती. पण सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबत काही वाद झाले त्यामुळे मित्रांचे घर सोडण्याचा तिने निर्णय घेतला. मॉडेल दुसरीकडे राहण्यासाठी घर शोधत होती. त्यादरम्यान तिची राजेंद्रशी मैत्री झाली. राजेंद्रने तिला स्वत:च्या घरी राहण्यास सांगितले. त्यानुसार गेले सहा महिने ती राजेंद्रसोबत राहत होती. पण त्याचदरम्यान राजेंद्रने दारू पाजून बलात्कार केल्याचा आरोप या मॉडेलने केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे एकाच गावचे आहेत. चारकोप पोलिसांनी राजेंद्र विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा